ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड क्रिकेटपटूंना पुन्हा भारतात पाठवणार?   

सिडनी : भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबलेला इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. पण उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात परततील का, हा एक मोठा प्रश्न होता. 
 
कारण ११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. त्याआधी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर अधिकृत निवेदन जारी केले आहे.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, खेळाडूंना भारतात परतायचे की नाही या त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांचे समर्थन करेल. 
 
पंजाब किंग्जकडे सध्या सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. पंजाबसह, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कामगिरी या हंगामात उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे जर ते आले नाही तर संघाच्या विजय किंवा पराभवावर परिणाम करू शकते.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे म्हटले आहे की, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये जाणार्‍या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी संघ व्यवस्थापन काम करेल. सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत आम्ही ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयच्या संपर्कात आहोत.जोश हेझलवूड आरसीबीकडून खेळतो, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो त्रस्त आहे आणि त्याला भारतात परतणे कठीण आहे. 
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे की तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी तंदुरुस्त होईल. स्टार्क भारतात परतणार नाही अशीही बातमी आहे. मिचेल स्टार्क, जेक फ्रेझर-मॅकगर्क (डीसी), स्पेन्सर जॉन्सन (केकेआर), मिचेल मार्श (एलएसजी), जोश हेझलवूड, टिम डेव्हिड (आरसीबी), मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट (पीबीकेएस) यांचा समावेश आहे.

Related Articles